विराटचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत झाला. विराटने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यापूर्वी त्याच्या नेतृत्वात भारताने अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता.
विराटने चीकूपासून किंग कोहली आणि ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम होण्यापर्यंत घेतलेली मेहनत जगातील प्रत्येक युवा खेळाडूसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
विराटने २०१४ मध्ये कसोटी संघाचा कर्णधार झाल्यापासून संघाला परदेशी भूमीवर लढायला शिकवले. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक मोठे यश संपादन केले आहेत.
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर-१ टीम बनली, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत पोहोचली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना त्याच्या भूमीवर पराभूत करण्यात टीम इंडियाला यश आले.
आपल्या नेतृत्वाखाली अंडर-१९ टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या विराट कोहलीने २० ऑगस्ट २००८ रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढील ४ वर्षांत तो संघाचा महत्त्वाचा सदस्य म्हणून उदयास आला.
२०१२ पासून आजपर्यंत विराट आपल्या फिटनेसमुळे क्वचितच सामन्यातून बाहेर पडला आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटू विराटकडे कसोटी क्रिकेटचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पाहतात.
विराट हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. महेंद्रसिंह धोनीकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. यातील ४० सामने भारताने विराटच्या नेतृत्वात जिंकले.