'रीलस्टार' सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. गायक अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघेजण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.
अखेरीस अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा निवेदक रितेश देशमुखनं सूरज चव्हाणचा हात उंचावत विजेता घोषित केलं.
बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा काल (6 ऑक्टोबर) रात्री पार पडला. या पर्वातील 16 सदस्यांना मागे टाकत बारामतीच्या सूरजने आपल्या 'झापुक झुपूक' अंदाजात ट्रॉफीवर नाव कोरलं.
बिग बॉसच्या या पर्वातील विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणला ट्राफीसह 14 लाख 60 हजार रुपये रक्कम मिळाली, तसंच इतर अनेक बक्षीसांचा वर्षावही झाला आहे.
बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो."
सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!"